नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा फोरम व आधार फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजन…
आधार फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक पाटील यांच्या जन्मदिवसाचे साधले औचित्य…
अमळनेर:- येथील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांना आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार, आदर्श शेतकरी ,आदर्श पोलीस पाटील यांचा पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम व आधार फाउंडेशनच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचे हस्ते गौरविण्यात आले.
सोहळ्यास आ.डॉ. सुधिर तांबे यांनी दूरध्वनीद्वारे संबोधित ‘समाजासाठी कार्य करणाऱ्या सेवाभावीवृत्तीच्या कृतिशील पुरस्कारार्थीचा गौरव इतरांपुढे आदर्श निर्माण करणारा ठरेल’ असे सांगितले. सरस्वती विद्या मंदिर येथे आधार फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक पाटील यांचा जन्मदिवसाचे औचित्य साधत आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात झाला.
याप्रसंगी मा.आ. कृषिभूषण साहेबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील यांनीही सोहळ्यास भेट दिली. जि प सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांनी ‘उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव इतरांना ही प्रेरणा देतो’ असे सांगत आ.अनिल पाटील यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्यात. प्रमुख मार्गदर्शक प्रा अशोक पवार , उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधव वर यांनी आदर्श शिक्षक, उत्कृष्ट पोलिस पाटील, आदर्श शेतकरी यांना आपल्या कार्यातून समाजापुढे भविष्यात नवनविन आदर्श निर्माण करण्यासाठी आवाहन केले. सत्कार मंचावर अमळनेर प सच्या गटशिक्षणाधिकारी सौ.एस पी चव्हाण, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, सौ.योगिता पाटील, सौ ताराबाई चव्हाण उपस्थित होते. यावेळी जळगांव जिल्हा संस्थाचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत पाटील, मा.जि प सदस्य डॉ अशोक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजक नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमचे नॅशनल डायरेक्टर गोरख देवरे , ऍडीशनल डायरेक्टर प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविकात ‘समाजातील चांगले हेरून लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न फोरम करीत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन सरस्वती विद्या मंदिर चे मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी केले.आभार फोरमतर्फे चे तालुकाध्यक्ष प्रफुल्ल पाटील व आधार फाउंडेशन तर्फे मुख्याध्यापक आशिष पवार यांनी मानले.
भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात अमळनेर परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कृतिशील ६१ शिक्षकांचा डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक गौरव सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कृषिक्षेत्रात कार्यरत असलेल्या लहान,व मोठ्या तसेच बागायतदार व कोरडवाहू अश्या २५ आदर्श शेतकरी यांचेसह कोरोना काळात राबणाऱ्या २१ आदर्श पोलीस पाटील यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानपूर्वक नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम व आधार फाउंडेशन च्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर, समता प्राथमिक विद्या मंदिरच्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,तसेच मानवाधिकार फोरम चे सौ.प्रिया पाटील व सहकारी यांनी परिश्रम घेतले.