राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठानतर्फे करण्यात आला सत्कार…
अमळनेर:- येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुण्यतिथी कार्यक्रमात मानस रत्नाकर पाटील या विद्यार्थ्याने महेश्वर नगरीची प्रतिकृती सादर केली होती तसेच या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्या देवींची हुबेहूब उत्कृष्ट रांगोळी कुमारी राधिका आप्पा बागले ह्या विद्यार्थिनीने काढलेली होती त्याप्रित्यर्थ या दोघांना राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान अमळनेर तर्फे स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बन्सीलाल भागवत सर, धनगर समाजाचे जेष्ठ नेते हरचंद लांडगे, कवी रमेश पवार, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नितीन निळे, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डी. ए. धनगर सर, प्रतिष्ठानचे सचिव एस.सी.तेले सर, प्रतिष्ठानचे संघटक प्रभाकर लांडगे, प्रतिष्ठानचे सदस्य रमेश देव शिरसाठ, निरंजन पेंढारकर सर, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गोपाल हडपे सर, चेतन देवरे, रत्नाकर पाटील, सुनिता पाटील, आप्पा बागले, ज्ञानेश्वर लांडगे , गणेश लांडगे, आदी उपस्थित होते.