अमळनेर:- तालुक्यातील रामेश्वर खु. येथे महिलेचा विनयभंग करत ब्लेडने मारण्याची धमकी दिल्याने पोलीसात तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामेश्वर खु. येथील १९ वर्षीय महिला शेतात प्रांतविधीसाठी गेली असता गावातील अजमल उखा वंजारी यांनी मागून येऊन महिलेचा विनयभंग केलं तसेच कोणाला सांगितल्यास ब्लेडने मारण्याची धमकी दिली. महिलेने आरडाओरड केल्याने आरोपी पळून गेला. सदर महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.