अमळनेर:- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदार प्रारूप यादी जाहीर करण्यात आली असून २३ नोव्हेंबर पर्यंत हरकत घेण्याची मुदत आहे.
१४ ते २३ नोव्हेंबर पर्यंत मतदार यादीवर हरकती मागविण्यात आल्या असून २ डिसेंबर रोजी आक्षेप व हरकतींवर जिल्हा उपनिबंधक निर्णय घेतील. व अंतिम मतदार यादी ७ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे संचालक पदासाठी इच्छुकांच्या तयारीला वेग येणार आहे.