
स्पर्धेतील पहिले पाच खेळाडू जाणार जिल्हास्तरावर…
अमळनेर:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर व योगेश्वर माध्य.विदयालय यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित शासकिय तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धांचे उद्घाटन अमळनेर नगर पालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनदाई संस्थेचे चेअरमन डी. डी. पाटील, मुख्याध्यापक के डी पाटील, साने गुरुजी पतसंस्थेचे सचिव तुषार पाटील, पत्रकार चंद्रकांत पाटील, प्रा. ए के अग्रवाल, एस पी वाघ, महेश माळी, प्रा.शैलेश पाटील, आर एस सोनवणे मॅडम उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला अगोदर छ.शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत योगेश्वर हायस्कुल, जी.एस हायस्कुल, डि आर कन्या शाळा, प्रताप कॉलेज, पी बी ए स्कुल, शारदा माध्य. विदयालय कळमसरे, सेंटमेरी स्कुल, स्वामी विवेकानंद ह्कुल , लोकमान्य हायस्कुल, ग्लोबल स्कुलच्या मुले व मुलीनी भाग घेतला. या स्पर्धेत पहिले पाच खेळाडू जिल्हा स्तरावर जाणार आहेत. या संपुर्ण कार्यक्रम चे सुत्रसंचलन प्रा. शैलेश पाटील, आभार एस आर जाधव यांनी मानले. या स्पर्धेसाठी के आर बाविस्कर, आर एका घुगे, अतुल बोरसे, आर जी राठोड, प्रा.प्रितेश तुरणकर, स्वप्नील पाटील ,हर्षदा सुर्यवंशी ,मोनिका चव्हाण, यज्ञेश जगताप ,विनोद पाटील उपस्थित होते. अमळनेर तालुका क्रीडा अधिकारी व कुस्ती कोच जगदिश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.







