तांत्रिक समितीवर प्रतिष्ठित सदस्य म्हणून स्तुत्य निवड…
अमळनेर:- अमळनेर तालुक्यातील मुडी प्र डांगरी येथील रहिवाशी व कोकणातील खालापूर येथील विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र व अभियांत्रिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक व विभागप्रमुख प्रा. डॉ. शशिकांत पाटील यांची ऍप्लाईड सिग्नल प्रोसेसिंग सिस्टिम्स या आंतराष्ट्रीय कीर्तीच्या तांत्रिक समितीवर २०२३ ते २०२६ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी स्तुत्य व प्रशंसनीय निवड करण्यात आली आहे.
आयट्रिपलई तथा आयईईई या जगद्विख्यात संस्थेच्या ३९ संस्था असून आय ट्रिपल ई सिग्नल प्रोसेसिंग सोसायटी ही त्यातील अग्रगण्य व नामांकित संस्था असून त्यातील ऍप्लाईड सिग्नल प्रोसेसिंग सिस्टिम्स हा एक तांत्रिक समुदाय तथा तांत्रिक गट असून त्यात जगभरातील तंत्रज्ञ शास्त्रज्ञ अभियंते प्रोफेशनल्स संशोधन प्रवर्तक रिसर्च स्कॉलर्स संशोधन अभ्यासक तज्ज्ञ मार्गदर्शक प्राध्यापक विद्यार्थी कार्यरत असून विविध तंत्रज्ञान व संशोधनाभिमुख प्रकल्प व उपक्रम यांत हिरीरीने सहभागी होतात. अतिविशिष्ट तांत्रिक क्षेत्रांमध्ये सिग्नल प्रोसेसिंग -संबंधित क्रियाकलाप अनुप्रयोग यांना सक्षम अन मजबूत होण्यासाठी तांत्रिक समित्या तयार केले गेले असून तांत्रिक समितीमधील सहभागामुळे उद्योग व्यावसायिक आणि शिक्षणतज्ञांना नेटवर्क बनवता येते आणि सिग्नल प्रक्रियेमध्ये स्वारस्य असलेल्या व आधुनिक तंत्रज्ञान व संगणक प्रणालीवर आधारित समुदाय अन त्यांचे तंत्रज्ञान आदान प्रदान प्रक्रियेत सहभागी होता येते. तांत्रिक समितीचे सदस्य म्हणून, तुम्हाला संशोधन पुरस्कार, संशोधन परिषद, संशोधन प्रकाशने आणि शैक्षणिक क्रियाकलापांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक संशोधन समीक्षक संशोधन परीक्षक तसेच निवड समिती सदस्य म्हणून सहभागी होण्याची संधी मिळते. यावर्षी जगभरातील एकूण १० जणांची तांत्रिक समितीवर निवड करण्यात आली
या समितीवर निवड होण्यासाठी संबंधित क्षेत्रातील विज्ञान तंत्रज्ञान संशोधन यांतील प्रगल्भ अनुभव शैक्षणिक अहर्ता योग्यता तसेच संबंधित क्षेत्रातील उमदेवाराचे योगदान या सर्व बाबीचा विचार करून नामनिर्देशन करण्यात येते. तदनंतर आय ट्रिपल ई संस्थेची तज्ज्ञ निवड समिती नामनिर्देशित उमेदवारांपैकी निवडीचे निकष लावून तसेच मतदान करून मर्यादित व इलेक्टीव्ह मेरिट असलेल्या पात्र उमदेवारांची निवड करते. या निवडीबद्दल सर्व स्तरांवरून प्रा. डॉ. शशिकांत पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.