अमळनेर:- येथील बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयात स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले.
स्मृतिदिनानिमित्त दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पूजन सुंदरपट्टीचे उपसरपंच मधुकर पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले. बाळासाहेबांची शिवसेना संपर्क कार्यालयास हा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी नगरसेवक संजय पाटील, सुंदरपट्टीचे लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक महेश देशमुख, सामाजिक कार्यकर्ते साखरलाल महाजन, झाडीचे गुणवंत पाटील, सुंदरपट्टीचे ग्रामपंचायत सदस्य लोटन दंगल पाटील, रामकृष्ण दगडू पाटील, एकनाथ विश्वास पाटील, प्रकाश लोटन पाटील, मच्छिंद्र पाटील, नवल पाटील, नाना सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.