तालुकाध्यक्षपदी ज्ञानेश्वर साळुंखे तर सचिवपदी नितीन पाटील यांची निवड…
अमळनेर:- येथील तालुका ग्रामसेवक संघटनेच्या नवीन कार्यकारणीची निवड काल दिनांक १९ नोव्हेंबर रोजी बिनविरोध पार पडली.
अमळनेर येथील पंचायत समितीच्या सभागृहात ग्रामसेवक संघटनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामंजस्याची भूमिका घेत सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक कार्यकारणीची निवड बिनविरोध करण्याचे एकमताने ठरवले. त्यानुसार अध्यक्षपदी ज्ञानेश्वर शांताराम साळुंखे, सचिव पदी नितीन सुरेश पाटील, उपाध्यक्षपदी समाधान निकम, महिला उपाध्यक्ष कविता साळुंके, कोषाध्यक्ष कमलेश निकम, सहसचिव प्रांजल वाघ, संघटक महेश ठाकूर, प्रसिद्धीप्रमुख नरेश सूर्यवंशी, महिला सदस्य शीतल पाटील, संगीता चौधरी, प्रमिला तायडे, सोनीबाई पाटील, जिल्हा प्रतिनिधी विजय माळी व ज्येष्ठ संचालकपदी नाना पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी निरीक्षक म्हणून विलासराव महाले यांच्यासह सुनील पाटील, राजेंद्र वाघ यांचे सहाय्य लाभले. यावेळी संजीव सैंदाणे, ज्ञानेश्वर भिला पाटील, सुरेश महाजन, रावसाहेब न्हाळदे, देविदास माळी, आर एल पाटील, रवींद्र सनेर, निलेश साळुंखे, नितीन भूपेंद्रसिंग पाटील, विलास पाटील, अविनाश पाटील, राजेश पाटील, भीमराव पाटील, जितेंद्र बोरसे, भूषण इधे, गुरुदास भाई, श्याम धनगर, विवेक सूर्यवंशी आदी ग्रामसेवक ग्रामसेविका तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या निवडीबद्दल नूतन अध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंखे व कार्यकारणीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.