अमळनेर:- बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी व प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या कृत्याचा अमळनेर युवक काँग्रेसकडून जोरदार निषेध करण्यात आला आहे.
नेहमी आपल्या बेताल वक्तव्यांनी चर्चेत राहणारे राज्यपाल कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. तसेच भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी याने छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाला पाच माफीनामे लिहले असे एका वृत्तवाहिनीवर बोलताना सांगितले. या बेताल व बेजबाबदार वक्तव्याचा युवक काँग्रेसकडून निषेध करण्यात आला असून हीच अनेक प्रवक्त्यांच्या व नेत्यांच्या तोंडून बाहेर पडत असते. यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश पाटील यांनी सांगितले की, महापुरुषांची बदनामी आम्ही खपवून घेणार नाही. तसेच मागील दोन दिवसांपासून सावरकरांसाठी थयथयाट करणाऱ्या राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोश्यारी व त्रिवेदीच्या वक्तव्या विरोधात लवकर भूमिका न घेतल्यास अमळनेर युवक काँग्रेस त्यांना बांगड्या पाठवणार आहे. या दोंघावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी आता सर्व स्तरातून जोर धरत आहे.