पाच डॉक्टरांनी साडेचार तास केली शस्त्रक्रिया…
अमळनेर:- शहरातील शाहआलम नगर भागात रोहिदास कौतिक चौधरी यांच्या म्हशीने एका विक्षिप्त रेडकूला जन्म दिल्याने बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती.
त्या रेडकूला दोन डोके, सहा पाय, दोन शेपूट आणि एक धड होते. दुर्देवाने ते रेडकू जन्माला आल्यापासूनच मृत होते. म्हशीला जेव्हा प्रसुती कळा जाणवू लागल्या तेव्हा रोहिदास चौधरी यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केले. डॉ. वाय.आर. सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने डॉ. गजानन चौधरी, डॉ. रवींद्र गाढे, डॉ. अजय साळुंखे व डॉ. सुरज बोराखेडे या टीमने सदर म्हशीवर सुमारे चार ते पाच तास शस्त्रक्रिया करून रेडकूला बाहेर काढले. मात्र ते रेडकू मृत झाले होते. मात्र या विचित्र रेडकुला पाहण्यासाठी रहिवाश्यांनी चांगलीच गर्दी केली होती.