
पातोंडा ता.अमळनेर:- सालाबादाप्रमाणे सप्तश्रृंगी मित्र मंडळातर्फे 24 वर्षाची परंपरा जपत आजपासून दत्त जयंती निमीत्त श्रीमद् भागवत कथा व किर्तन सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. दत्त भजनी मंडळ व सप्तश्रृंगी मंडळातर्फे टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढत सप्तश्रृंगी मंदिरांच्या प्रांगणात श्रीमद् भागवताची स्थापना करण्यात आली. दररोज पहाटे काकडा आरती , सकाळी नऊ ते पाच श्रीमद् भागवत कथा वाचन , सायंकाळी हरिपाठ व रात्री किर्तनसेवा याप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 30 पासून हभप गजानन महाराज (चौगाव) , हभप राजेंद्र महाराज (पिंपळकोठा), हभप शशिकांत महाराज (भवरखेडा) , हभप समाधान महाराज (रिंगणगाव) , हभप कैलास महाराज (कुरंगी) , हभप राजेंद्र महाराज (कासोदा) , हभप जनार्दन महाराज (मराठखेडा), हभप भावराव महाराज मुक्ताईनगर यांचे हरिकीर्तन सेवा होणार आहेत. किर्तन सेवेकरिता नरेश पाटील, किशोर पाटील, अरूण पाटील, अशोक बाविस्कर, अरूण लासूरकर, मच्छिंद्र पाटील, दगा पाटील, दिनकर देवरे, साईराज टेन्ट हाऊस, राजलक्ष्मी डिजीटल, बिजासनी साऊंड व सानेगुरूजी मित्र मंडळाचे विशेष सहकार्य लाभले आहे. दि. 7 डिसेंबर रोजी काल्याच्या किर्तनाने भागवत कथा समाराप होणार आहे. श्रीमद् भागवत कथा सप्ताहास समारोपाचे अन्नदान सेवा सेवानिवृत्त शिक्षक गोविंदा बिरारी यांचे तर्फे देण्यात येणार आहे.







