दोन्ही गटांची एकमेकांविरुद्ध पोलीसात तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील एकतास येथे किरकोळ कारणावरून हाणामारी झाली असून दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध पोलीसात तक्रार दिली आहे.
पहिल्या गटाच्या वतीने देण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, फिर्यादी गोकुळ आनंदा बच्छाव (वय ४२, धंदा शेती) हे २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतीजवळ उभे असताना दुर्योधन वाघ, भरत वाघ, शाम वाघ, निंबा वाघ, तिरोणा वाघ, अनिता वाघ, योगिता वाघ यांनी शेताच्या जुन्या वादावरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. व वादात फिर्यादीच्या पत्नीची करंगळी मोडली व फिर्यादीस ही किरकोळ दुखापत केल्याने पोलीसात तक्रार दिल्याने विविध कलमान्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दुसऱ्या गटातर्फे देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी शाम पाटील हा दिनांक २४ रोजी गावात सार्वजनिक जागी असताना गोकुळ पाटील याने कोयत्याने उजव्या हातावर मारले. फिर्यादीच्या वडील व काकाने याचा जाब विचारला असता गोकुल पाटील व उज्वला पाटील यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे या दोघांविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. पुढील तपास स.फौ. किशोर पाटील हे करीत आहेत.
ह्या बातम्या देखील वाचा
December 22, 2024