
आपकडून महावितरणला निवेदन, आंदोलनाचा दिला इशारा…
अमळनेर:- येथील महावितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंता यांना आम आदमी पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांनी शेती पंपाचे विज बिल भरून सतत विज कनेक्शन खंडीत होत असते तरी रब्बी हंगाम पेरणी झाली असुन ऐनवेळी महावितरण कडुन विज खंडीत होत असल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. अतिवृष्टी व बेमोसमी पाऊस आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्याला अजून त्रास देवू नका या मागणी करीता महावितरण विभाग यांना दि. 30 नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले. तरी महावितरण यांनी विज खंडित न करता शेतकरी बांधवांसाठी नियमितपणे विज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आम आदमी पार्टी मोठया आंदोलनाचा पवित्रा घेईल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. यावेळी आम आदमी पार्टी जिल्हा संयोजक प्रा. गणेश पवार, तालुका सचिव नाना अभिमन पाटील तथा सोशल मीडिया अध्यक्ष मुकेश राजपूत (जैतपिर) आदी उपस्थित होते.







