
अमळनेर:- मुंबई येथील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. यात नवलभाऊ प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अनिकेत विजय पाटील यांची सिनेट सदस्य पदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांची ही निवड खुल्या प्रवर्गातून करण्यात आली आहे. त्यांच्या समवेत अरुण पांडुरंग चौधरी (जळगाव) यांची खुल्या व इतर मागासवर्गीय प्रवर्गातून, स्मिता अतुल अजमेरा (धुळे) यांची महिला प्रवर्गातून तर प्रांजल सचिन भोगवार (नागपूर) यांची खुल्या प्रवर्गातून सिनेट सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून प्रा विलास नंदवाडेकर यांनी काम पाहिले. त्यांच्या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ग्राम विकास तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, भाजप प्रदेश सरचिटणीस तथा युवा मोर्चा प्रदेश प्रभारी विक्रांत पाटील, ‘भाजयुमो’ चे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी अभिनंदन केले आहे.







