मराठी वाङ्ममय मंडळ व आप्पासाहेब केले वाचनालयाच्या वतीने आयोजन…
अमळनेर:- येथील मराठी वाङ्ममय मंडळ व आप्पासाहेब केले सार्वजनिक ग्रंथालय वाचनालयाच्या वतीने अमळनेर येथे ३ व ४ डिसेंबर २०२२ ला भव्य जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन पू.साने गुरुजी साहित्य नगरी , प्रताप महाविद्यालय येथे करण्यात आलेले आहे.
अमळनेर येथे संपन्न होत असलेल्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.प्रांजल पाटील तर संमेलनाध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे चे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी हे असतील . दि.३ डिसेंबर ला ग्रंथ पूजन सोहळा तसेच वा.रा.सोनार ग्रंथ दालन उद्घाटन दुपारी ३ वाजता सुप्रसिद्ध वास्तु विशारद चेतन सोनार यांच्या हस्ते ग्रंथ पूजनाने संपन्न होईल. साहित्य संमेलन उद्घाटन सोहळा सायंकाळी ४.३० ला सुप्रसिद्ध साहित्यिक मा.प्रभाकर साळेगावकर यांच्या शुभहस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी सभा मंडपात होईल. याप्रसंगी अ भा म सा प चे कार्याध्यक्ष नरेंद्र पाठक,साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य नवनाथ गोरे , पुष्पराज गावंडे , सचिव सौ मीनाक्षी पाटील, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ मिलिंद बागुल, साहित्यिक वि.दा.पिंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
सायंकाळी ६.३०ला ज्येष्ठ कवी पांडुरंग सुतार यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन संपन्न होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कवी शशिकांत हिंगोणेकर हे उपस्थित राहतील. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दि.४ डिसेंबरला कविवर्य बालकवी ठोंबरे कवी कटाचे उद्घाटन प्रा. नरेंद्र पाठक यांच्या हस्ते होईल.कविकट्टा आयोजन समितीचे डॉ कुणाल पवार यांच्या उपस्थितीत होईल. सकाळी ९ वाजता “सोशल मीडिया आणि त्याचा समाज जीवनावर होणारा परिणाम” या विषयावर लेखक, विचारवंत प्रा डॉ एल ए पाटील यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. सदर परिसंवादात प्रा डॉ.रमेश माने, प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,प्रा.उषा पाटील, साहित्यिक वि.दा. पिंगळे आदी सहभागी होतील. दुपारी ११ वाजता सुप्रसिद्ध साहित्यिक ऍड.विलास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन कार्यक्रम संपन्न होणार असून त्यात साहित्यिक गोकुळ बागुल, प्रा.सौ. योगिता पाटील, सुनिल गायकवाड आदी मान्यवर सहभाग घेतील. सदर जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचा समारोप समारंभ हा विचारधारा प्रशाळा व क.ब.चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.म.सु.पगारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल.
सदर दोन दिवसीय साहित्य संमेलनात रसिक, प्रेक्षक,साहित्य चळवळीतील कार्यकर्ते, नवोदित कवी लेखक व श्रोते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संमेलन समिती प्रमुख कवि रमेश पवार, अमळनेर म वा मंडळ अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी केलेले आहे.अमळनेर येथे संपन्न होत असलेल्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पू. साने गुरुजी ग्रंथालय, महाराष्ट्र साहित्य परीषद शाखा अमळनेर, खानदेश शिक्षण मंडळ, प्रताप महाविद्यालय, ज्येष्ठ नागरिक संघ, अमळनेर पत्रकार संघाचे सर्व सन्माननीय पत्रकार बंधू , अमळनेर नगर परिषद, खानदेश साहित्य संघ आदि.संघटना, संस्थांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
ह्या बातम्या देखील वाचा
December 22, 2024