
कर्जबाजारीपणामुळे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा…
अमळनेर:- तालुक्यातील दहिवद येथे ४८ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल ९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे.

गणेश ओंकार पाटील (वय ४८) असे या मयत शेतकऱ्याचे नाव असून त्याने सकाळी स्वतःच्या शेतात जात निंबाच्या झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कर्जाच्या चिंतेत हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत असून अमळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.







