अमळनेर:- तालुक्यातील डांगरी येथे शेतातून पाईप चोरुन नेल्याप्रकरणी शेतकऱ्याने मारवड पोलीसात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डांगरी येथील शेतकरी राजाराम पोपट शिसोदे यांच्या मालकीच्या डांगरी शिवारातील शेतातून दिनांक २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत तीन हजार रुपये किमतीचे १० पाईप अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचा लक्षात आल्याने त्यांनी मारवड पोलीसात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पो.हे. कॉ. मुकेश साळुंखे करीत आहेत.