विविध मान्यवरांनी युवक- युवतींनी भरतीत यशस्वी होण्याचे दिले धडे…
अमळनेर:- सद्यस्थितीत पोलीस भरतीचे वारे वाहू लागले आहेत. योग्य नियोजन व योग्य मार्गदर्शनाने आगामी भरतीत खान्देशातील युवकांचा टक्का वाढवा या पार्श्वभूमीवर येथील प्रताप महाविद्यालय, प्रताप तत्वज्ञान केंद्र व उत्कर्ष खान्देशी अधिकारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय भव्य मोफत पोलीस भरती महाशिबीर घेण्यात आले. या शिबिरात सुमारे २५० युवक- युवतींनी पोलीस भरतीत यशस्वी होण्याचे धडे देण्यात आले.
सोमवारी झालेल्या शिबिराच्या समारोपप्रसंगी पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या हस्ते गुणवंत युवक- युवतींना सन्मानित करण्यात आले. प्रताप तत्त्वज्ञान केंद्राचे मानद संचालक प्रा दिलीप भावसार हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी नागपूर महानगर विकास प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार, प्रभारी कमांडन्ट तथा सुभेदार मेजर नागराज पाटील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र खैरनार, युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील, केंद्राच्या विभाग प्रमुख प्रा डॉ राधिका पाठक, सल्लागार समिती चे सदस्य प्रा डी डी पाटील, माजी प्राचार्य डॉ एस आर चौधरी, डी ए धनगर, प्रा डॉ विजय तूंटे, दिलीप शिरसाठ, प्रा भूषण बिरारी, विलास चव्हाण, प्रेमराज पवार, प्रवीण पाटील, चंद्रकांत पाटील, प्रा मनोज रत्नपारखी, भैय्या पाटील आदी उपस्थित होते. उमेश काटे व व्ही ए पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान विविध सत्राचे उद्घाटन खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक सीए नीरज अग्रवाल, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ अविनाश जोशी, लायन्स क्लबचे चेअरमन योगेश मुंदडा, डॉ दिनेश पाटील, मुख्याध्यापक छगन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा अभिनेते लीलाधर पाटील, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक देविदास साळवे (पाचोरा), स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक खेमचंद्र पाटील (जळगाव), आर के अकॅडमी चे संचालक रविंद्र कुंभार (जळगांव), वामन पाटील (चाळीसगाव), सुभेदार मेजर नागराज पाटील यांचे विविध विषयांवर मार्गदर्शन मिळाले. शारीरिक चाचणी प्रशिक्षणसाठी सुभेदार मेजर नागराज पाटील, पोलीस समाधान पाटील, पोलीस चंदन पाटील, नायब सुभेदार बी पी पाटील, राजेंद्र सूर्यवंशी (मारवड), नवल शिरसाठ, अशोक चौधरी, पोलीस प्रविण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेचा निकाल असा…
लेखी परीक्षा (मुले) प्रथम- दिनेश भरत चौधरी, द्वितीय- भुषण राजेंद्र वाघ, तृतीय- बबलू रमेश धनगर, सुशिल समाधान धनगर
लेखी चाचणी (मुली)
प्रथम- राजेश्री गणेश सोनवणे, द्वितीय- भाग्यश्री विकास पाटील, तृतीय- रतन मोतीलाल कुमावत, उत्तेजनार्थ- ऐश्वर्या अमोल महाले, करुणा गोकुळ संदानशिव
शारीरिक चाचणी (मुले)
प्रथम-विशाल सोनवणे, द्वितीय-हेमंत पाटील, तृतीय- दर्शन भामरे, इकबाल खान, नूरअली खान
शारीरिक चाचणी (मुली)
प्रथम- सरला महाजन, द्वितीय- ज्योती महाजन, तृतीय- पूजा पाटील