अमळनेर पोलिसांची कारवाई, २.३० लाखाचा मुद्देमाल…
अमळनेर:- शहरातील बस स्थानकात अमळनेर पोलिसांनी १५ किलो गांजासह एका इसमास जेरबंद केले आहे.
पो. नि. विजय शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की, राधेश्याम रामसिंग पावरा व सुरेश साहेबराव भदाने (रा. हिसाळे ता. शिरपूर) हे गांजा बाळगून आहेत. छापा टाकून त्यास पकडण्यास गेले असता सुरेश भदाणे हा पळून गेला.मात्र राधेश्याम पावरा याच्याकडे १५ किलो ५६६ ग्रॅम वजनाचा २ लाख ३० हजार किमतीचा गांजा मिळून आला. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास पो. नि. विजय शिंदे करीत आहेत. सदर कारवाई कामी पो. नि. शिंदे यांच्यासह स. फौ. राजेंद्र कोठावदे, हे. कॉ. किशोर पाटील, पो.ना. दीपक पाटील, रवींद्र माळी, मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे, सिद्धांत सिसोदे, पो. कॉ. हर्षल पाटील, विलास बागुल, तलाठी प्रदीप भदाणे, अशोक पवार, फोटोग्राफर सागर पाटील, तराजूमापक रोहन आठवले यांचे सहकार्य लाभले.