स्व. अनुसया बेहरे यांच्या पुण्यस्मरणानिमीत्त शिबीराचे आयोजन…
पातोंडा ता.अमळनेर:- येथून जवळच असलेल्या दहिवद येथे सरपंच देवानंद बेहरे यांच्या मातोश्री स्व. अनुसया कपूरचंद बेहरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमीत्त गोदावरी फाऊंडेशनच्या सहकार्याने बचत गट सभागृहात आरोग्य शिबिर घेण्यात आले.
उपसरपंच प्रविण माळी यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. आरोग्य शिबिरात रूग्णांची मुतखडा, मुत्रपिंडातील खडे, प्रोस्टेट, पित्ताशयातील खडा, नाक कान घसा, नेत्ररोग तपासणी, स्रीयांचे विवीध आजारांची तपासणी, अस्थीरोग तपासणी, हृदय रोग तपासणी करण्यात आली. दहिवद व शेजारील गावातील ग्रामस्थांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. गोदावरी फाऊंडेशनचे डाॅ अब्दूल्ला, डाॅ चैतन्य, डाॅ शिफा व टिमचे उत्कृष्ट सहकार्य लाभले. याप्रसंगी सरपंच देवानंद बेहरे, जयवंत पाटील चेअरमन नवभारत विद्यालय, ईश्वर माळी चेअरमन विकासो दहिवद, ग्रा पं सदस्य माणिकराव पाटील, हिराबाई भिल, वर्षा पाटील, मालूबाई माळी, सुनिल पाटील , शिवाजी पारधी, योगिता गोसावी, वैशाली माळी आदी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. जिजाबराव माळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर शिवाजी पारधी यांनी आभार व्यक्त केले.