
एकलहरे येथील घटना, पोलीसात तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील एकलहरे येथे घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविल्याची घटना २६ डिसेंबर रोजी रात्री घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एकलहरे येथील भोलेराज हरिश्चंद्र पाटील (वय २३) याची यामाहा कंपनीची एफझेड एस मोटारसायकल क्रमांक एमएच १९ डीटी ३६३५ ही दिनांक २६ रोजी रात्री राहत्या घरासमोर लावली होती. दिनांक २७ डिसेंबर रोजी सकाळी दुचाकी घरासमोर आढळून न आल्याने आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र दुचाकी मिळून न आल्याने मारवड पोलीसात तक्रार देण्यात आली आहे. याबाबत कलम ३७९ अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे. कॉ. सचिन निकम हे करीत आहेत.







