अमळनेर:- तालुक्यातील रंजाणे येथे बोरी नदीकाठी बेवारस मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गावातील महिला बोरी नदीकाठी स्मशान भूमीजवळ गेली असता त्याठिकाणी बेवारस मृतदेह दिसून आल्याने त्यांनी पोलीस पाटील रवींद्र पाटील यांना कळविले. त्याठिकाणी जावून पाहणी केली असता मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. पोलीस पाटील यांनी खबर दिल्यावरून मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे. कॉ. विशाल चव्हाण हे करीत आहेत.







