
महाप्रसादाचा घेतला लाभ, घोषणांनी दुमदूमला परिसर…
अमळनेर:- मॉ तापी संपूर्ण परिक्रमा पदयात्रा २०२३ हे पदयात्रेचे तिसरे वर्ष असून तालुक्यातील मुंगसे व बोहरा येथे ग्रामस्थांतर्फे स्वागत करण्यात आले.
सूर्यकन्या तापी माँ प्रतिमेचे पूजन करून पदयात्रेतील सर्व भाविक भक्तांना व गावातील ग्रामस्थांनी मुंगसे व बोहरे येथे महाप्रसादाचा लाभ घेतला. ही पदयात्रा मुलताई मध्यप्रदेश येथून २ जानेवारी पासुन सुरुवांत झाली असून सुरत येथे १ फेब्रुवारी रोजी पोहचणार आहे. आणि उत्तर दिशा कडून मुलताई येथील मध्यप्रदेशात उगमस्थानावर दि.५ मार्च २०२३ रोजी पोहचुन पद यात्रेचे समारोप होणार आहे. एकुण ६४ दिवसाचा प्रवास आहे. मुंगसे येथून रुंधाटी, मठगव्हाण . जळोद मार्गे पुढील प्रवासासाठी प्रस्थान झाले. काल १९ तारखेला गुरुवारी बोहरा येथे त्यांचे दुपारचे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते. मुंगसे येथे या पदयात्रेसाठी स्वामी भक्तानंद गुरुदेवानंद प्रतिष्ठान, निमगव्हाण येथील ट्रस्टी व संचालक मंडळ, परिसरातील भक्तांनी सुर्य कन्या तापी माई प्रतिमेचे दर्शन घेऊन पुजा-अर्चा करून महाप्रसादाचा लाभ घेतला. तापी माई की जय हो! सत्य की जय हो! अशा घोषणा व भजनांनी गांव व परिसर दुमदुमला तसेच परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.







