अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे १९ ते २६ जानेवारी दरम्यान श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
मारवड येथील श्री शिव महापुराण कथा सेवा समिती व ग्रामस्थांकडून श्री विठ्ठल मंदिर चौकात श्री शिवमहापुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले असून १९ ते २६ जानेवारी सकाळी ५:३० वाजता काकड आरती, सायंकाळी ७:३० वाजता शिव आरती व रात्री ८ ते ११ शिवकथा असा दैनंदिन कार्यक्रम आहे. काल्याचे कीर्तन गुरुवार दिनांक २६ रोजी सकाळी ९ वाजता असून सकाळी ११ पासून महाप्रसादास सुरूवात होणार आहे. श्रीकृष्ण कृपामुर्ती भागवताचार्य श्री हभप वामनजी महाराज (लामकानी) यांच्या अमृत वाणीतून सर्व भाविक भक्तांनी शिवकथा श्रवणाचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री शिव महापुराण कथा सेवा समिती व मारवड ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.