
संवेदनशील भागात पथसंचलन, शांतता कमेटीची घेतली बैठक…
अमळनेर:- काल दिनांक ४ फेब्रुवारी रोजी अमळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार, रॅपिड अॅक्शन फोर्स व आरसीपी जळगांव यांचा अमळनेर शहरातील संवेदनशील भागातून पोलीस रूट मार्च घेण्यात आला.

सदरील पोलीस रूट मार्च हा आगामी काळातील सण व उत्सव लक्षात घेता पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या हेतूने पथसंचलन करण्यात आले. सदरील पोलीस रूट मार्च हा पोलीस कवायत मैैदानापासून सुरु करुन पवन चौक, झामी चौक, माळीवाडा, बहादरपुर नाका, भोईवाडा, कसाली डीपी, वाडी चौक, पान खिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा व शेवटी समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गांधलीपूरा पोलीस चौकी येथे येऊन पथसंचलनाची सांगता झाली. यात डीवायएसपी राकेश जाधव, रॅपिड अॅक्शन फोर्सचे डेप्युटी कमांडंट शशिकांत राय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे, आरएएफचे निरीक्षक संतोष कुमार यादव, निरीक्षक राजकुमार सिंग, निरीक्षक बलकारसिंग, निरीक्षक अजयकुमार सिंग, मारवड पो. स्टे. सपोनि जयेश खलाने, पोलीस उपनिरीक्षक नरसिंह वाघ, महिला पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोड तसेच अमळनेर पोलीस स्टेशनचे ४५ अंमलदार तसेच आरएएफचे ७० पुरुष कमांडो व ५ महिला कमांडो अशा ७५ जणांची तुकडी सह पोलीस रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च नंतर गांधलीपूरा पोलीस चौकीत शांतता कमेटीची बैठक पार पडली. यात डीवायएसपी राकेश जाधव, डेप्युटी कमांडंट शशिकांत राय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी आगामी काळातील सण उत्सव लक्षात घेता शहरात शांतता अबाधित राहून कायदा व सुव्यवस्था कसा राखता येईल याविषयी शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली. या मीटिंग मध्ये शहरातील शांतता कमेटीचे सदस्य, माजी नगरसेवक, पत्रकार बांधव असे उपस्थित होते. सदर पोलीस रूट मार्चसाठी एएसआय संजय पाटील, पो.ना. डॉ. शरद पाटील, पो.ना. दीपक माळी, पो.ना. रवि पाटील, पो.ना. सिद्धार्थ सिसोदे, हे. कॉ. मधुकर पाटील यांनी मेहनत घेतली. सदर शांतता बैठकीचे सूत्रसंचालन व आभार गोपनीय शाखेचे डॉ. शरद पाटील यांनी मानले.







