
काल पहाटे तलाठ्यांच्या पथकाची कारवाई…
अमळनेर:- काल दिनांक ४ रोजी पहाटे तलाठ्यांच्या पथकाने कारवाई करत जळोद येथून वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले आहे.
दिनांक ४ फेब्रुवारी रोजी ६:३० वाजता जळोद येथून वाळू वाहतूक करणारे डंपर अमळनेर रस्त्यावर पकडत मुद्देमालासह अमळनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. सदर पथकात नायब तहसीलदार लांडगे, व्ही पी पाटील, चौधरी भाऊसाहेब, तलाठी ए.बी. सोनवणे, संदीप शिंदे, प्रकाश महाजन, सतीश शिंदे, भूपेश पाटील, मधुकर पाटील, प्रदीप भदाणे, तिलेश पवार, बळीराम काळे, वाय आर पाटील, तलाठी जितेंद्र पाटील यांचा समावेश होता.







