कृषी विभागाच्या वतीने गावकऱ्यांना मार्गदर्शन…
अमळनेर:- तालुक्यातील ढेकू सिम येथे कृषी विभागाच्या वतीने कार्यशाळा घेत विविध योजनाबाबत गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
दिनांक ३ फेब्रुवारी रोजी ढेकू सिम येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष व प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्नप्रक्रिया योजना प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी मंडळ कृषी अधिकारी ए.एस .खैरनार, कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी, तांत्रिक समन्वयक पोकरा सुनील गुजराथी, कृषी सहाय्यक अजय पवार, निशा सोनवणे, नलिनी पाटील, पोखरा शेतीशाळा प्रशिक्षक रोहित वाघ, सरपंच व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. यावेळी खैरनार यांनी पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व सांगून शेती क्षेत्रात तृणधान्याच्या वाढीविषयी मार्गदर्शन केले. व वंजारी यांनी सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच गुजराथी यांनी आंतरराष्ट्रीय तृणधान्याची संकल्पना मांडली. यावेळी अजय पवार व निशा पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांना पाककलेची उदाहरण देऊन पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व पटवून दिले. नलिनी पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व शपथविधी घेतला. यावेळी महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.