न्यायालयाने ठोठावली ७ दिवसांची पोलीस कोठडी…
अमळनेर:-अमळनेर पोलिसांनी निर्जनस्थळी लपून बसलेल्या सराईत गुन्हेगार विशाल सोनवणे यास शिताफीने अटक करत न्यायालयापुढे हजर केले असता त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
आरोपी विशाल विजय सोनवणे रा. फरशी रोड, अमळनेर यांने एका गुन्ह्यातील फिर्यादीस शिवीगाळ करुन लोखंडी फायटरने मारहाण केली व पिस्टल फिर्यादीच्या कपाळावर लावुन फिर्यादीच्या खिशातून १००० रु. काढुन घेतले होते. त्यावरुन अमळनेर पोलीस स्टेशनला भा.द.वि. कलम ३९४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे दि.२६ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाल्यापासुन नमुद आरोपी विशाल विजय सोनवणे हा फरार होता. काल वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळालेल्या माहीतीवरुन आरोपी विशाल विजय सोनवणे हा निर्जन स्थळी लपुन बसला आहे. त्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी तात्काळ पोउनि. विकास शिरोडे, पोहेकॉ सुनिल जाधव, पोहेकाँ. चंद्रकांत पाटील, पोना हिरालाल पाटील, पोकॉ. सागर साळुंके, पोकॉ राहुल चव्हाण, चापोका सुनिल पाटील अश्यांचे पथक तयार करुन त्यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले. सदरील पथकाने निर्जन स्थळी आरोपी विशाल विजय सोनवणे यास शिताफिने ताब्यात घेतले. आरोपी विशाल विजय सोनवणे यास अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची ०७ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. आरोपी विशाल सोनवणे याचा पुर्व इतिहास पाहता तो अमळनेर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर दहशत घालणे, गंभीर जखमी करणे, जबरी चोरी करणे, मोटार सायकल चोरी करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अमळनेर पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.