अमळनेर पोलिसांच्या पथकाची कौतुकास्पद कामगिरी…
अमळनेर:- अमळनेर पोलीस ठाण्यातील एका गुन्हयात फरार असलेल्या आरोपीस मध्यप्रदेश राज्यात शोध घेवुन त्यास शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे.
दिनांक १० नोव्हेंबर २०१३ रोजी फिर्यादी मनोज देविदास पाटील रा. जुने बस स्थानक अमळनेर यांना आरोपी कालु उर्फ विशाल दुर्गादास जाधव रा. गांधलीपुरा याने नाचताना धक्का लागल्याने फिर्यादीस तोंडावर ठोसा मारत हातातील वस्ताराने गळ्यास कंठाजवळ व पायाच्या मांडीवर मारुन जखमी केले होते. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला भादवि कलम ३२४ प्रमाणे दाखल गुन्हा दाखल होता. सदर आरोपी हा आजपावेतो फरार होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी वेळोवेळी तपास पथके पाठविण्यात आली होती मात्र तो मिळुन येत नव्हता. दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळालेल्या गोपणीय बातमीनुसार सदरचा आरोपी हा त्याचे नाव बदलुन इंदोर शहरात राहत असल्याची माहीती मिळाल्याने पोउपनि अनिल भुसारे, पोना मिलींद भामरे, पोना. सुर्यकांत साळुंखे यांना योग्य त्या सुचना देवुन रवाना केले होते. त्या प्रमाणे इंदोर शहरात त्याचा शोध घेत असताना पोलीस पथकास तो दिनांक ११ रोजी रात्री दिसुन आल्याने तो पोलिसांना पाहुन पळु लागला असता त्यास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी चतुराईने पकडुन अमळनेर पोलीस स्टेशनला हजर केले. पीआय शिंदे व अमळनेर पोलिसांच्या पथकाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.