मारवड पोलीसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील शिरसाळे येथून २१ वर्षीय तरुण लग्नाला जावून येतो असे सांगून घरातून निघाल्यानंतर दिवस उलटून ही न परतल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार मारवड पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरसाळे येथील रुपेश रोहिदास पाटील (वय २१) हा दिनांक १० फेब्रु. रोजी सकाळी ७ वाजता गावातील लग्नासाठी वटार ता. चोपडा येथे जावून येतो असे सांगून गेला. दुपारी तीन वाजता तो न आल्याने त्यास फोन केला असता फोन बंद येवू लागला. नातेवाईकांकडे व परिसरात तपास करून कोणतीही माहिती न मिळाल्याने काल मारवड पोलीसात ऋषिकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पो. ना. भरत श्रीराम इशी हे करीत आहेत.