
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील माहेर असलेली राजकोट येथील १९ वर्षीय विवाहिता लग्नासाठी आलेली असता मांडळ येथून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईने दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १९ वर्षीय विवाहितेचे एका वर्षापूर्वी लग्न झालेले असून ती सासरी राजकोट येथे राहत होती. दिनांक ११ रोजी लग्न असल्याने ती सासरच्या मंडळींसह मांडळ येथे माहेरी आली होती. दिनांक १२ रोजी सकाळी ५:३० वाजता ती घरात दिसून न आल्याने आजूबाजूला व नातेवाईकांकडे शोध घेतला असता काहीच तपास न लागल्याने तिच्या आईने पोलिसांत धाव घेतली असून ज्योती जयदेव नाथबुवा यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना. भरत श्रीराम ईशी हे करीत आहेत.







