
25 फेब्रुवारीला पहिले गीत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, अमळनेरातीलच कलाकार, गीतकाराचा समावेश….
अमळनेर:- अहिराणी भाषेच्या वैश्विक प्रचार आणि प्रसाराचे उद्दिष्ट ठेवून अमळनेर, जळगाव, नामपूर आणि नाशिक येथील डाॅक्टर्स आणि बँकर्स यांनी मिळून ‘ बोलीभाषा प्रॉडक्शन ‘ या नावाने यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे.
या चॅनेलच्या पहिल्या गाण्याचे टीझर लाँच झाले असून त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि दि.25 फेब्रुवारीला येत्या शनिवारी संध्याकाळी हे संपूर्ण गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्याचे संपूर्ण शूटींग अमळनेरातच झाले असून यातील कलाकार, गीतकार अमळनेरातीलच आहे.
राज दाभाडे,शुभांगी पाटील, करणसिंग राजपूत यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या गाण्याचे गीतकार अभिजीत मगरे हे आहेत. मयूर साळुंखे (धुळे) यांनी या गाण्याला संगीत दिले असून प्रशांत देसले (धुळे) यांनी हे गाणे गायले आहे.डि.ओ.पी.पंकज अहीरे, मेकअप आर्टीस्ट सुषमा कासार, प्रितेष पाटील,अजय पवार,अजय पाटील,विवेक पाटील यांनी सहकार्य केले.या गाण्याच्या मार्केटिंग ची धुरा अविनाश बोरसे आणि प्रकाश पाटील (राॅकिंग गाईज, अमळनेर) यांनी सांभाळली असून या चॅनेलच्या प्रोडक्शन टीम मध्ये डाॅ.समीर अहिरे (नाशिक), डाॅ.अजय वाघ (नामपूर), डाॅ.योगिता शिंदे (जळगांव), डाॅ.गिरीश गोसावी, डाॅ.अतुल चौधरी, डाॅ.हेमंत कदम,डाॅ.दिनेश पाटील, डाॅ.पुजा वाघुले- पंजवाणी, डाॅ.अक्षय न्हाळदे, डाॅ.जय देशमुख, मयूर पाटील (शाखाधिकारी ,युनियन बँक) यांचा समावेश असून “बोलीभाषा प्राॅडक्शन” या यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून गाणे जास्तीत जास्त लोकांनी बघून लाईक व शेअर करावे असे आवाहन निर्मात्या टीमने केले आहे.







