
अमळनेर:- एम एस्सी केमिस्ट्री विषयात प्रथम आल्याने धनश्री कश्यप हीचा सुवर्ण पदक देवून गौरव करण्यात आला.
अमळनेर येथील धनश्री जगदीश कश्यप हिला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम एस्सी एन्यालिटिकल केमिस्ट्री विषयात १० पैकी ९.९५ गुण व ओ श्रेणी मिळाल्याने विद्यापीठात प्रथम आली आहे. विद्यापीठाने दीक्षांत समारंभात तिला सुवर्णपदक पदक देऊन गौरविले आहे. तिला डॉ डी एच मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. ती निवृत्त शिक्षक जे जे कश्यप व अलका कश्यप यांची मुलगी आहे. तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.







