
१५ दिवसात दुसऱ्यांदा तारांची चोरी, तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील गोवर्धन शिवारात १५ दिवसातच चोरट्यांनी दुसऱ्यांदा वीजतारांवर हातसाफ केले असून २७०० मीटर तार चोरुन नेली आहे. याप्रकरणी मारवड पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
महावितरणचे कनिष्ठ अभियंता किशोर सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक १७ मार्च रोजी शेतकऱ्याने कळविले की, शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता लाईन कट झाली आहे. त्यानतंर शेतकरी व कर्मचारी यांनी डीपी व लाईन चेक केली असता १२ गाळ्यांची २७०० मीटर लांबीची अंदाजे ७५ हजार किमतीची अल्युमिनियमची तार कट करून अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे लक्षात आले. त्यावरून मारवड पोलिसांत तक्रार देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान पंधरा दिवसात दुसऱ्यांदा गोवर्धन शिवारातच तारांची चोरी झाली आहे.







