अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय येथे शनिवार दिनांक 25 मार्च रोजी “इतिहास आणि राज्यशास्त्र” या विभागाकडून संशोधन कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वसंत देसले हे होते. तर विद्यार्थ्यांना संशोधनाविषयी व्याख्यान देण्याकरिता प्रमुख अतिथी म्हणून प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील इतिहास विभागाचे प्रा. डॉ. धनंजय चौधरी उपस्थित हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी केले. यामध्ये त्यांनी इतिहास संशोधन ही प्रगतशील आणि प्रभावी होण्याची गरज आहे, असे मत मांडले. तद्नंतर प्रमुख अतिथी डॉ. धनंजय चौधरी यांनी प्रस्तुत संशोधनाची संशोधन पद्धती यावर प्रकाश टाकला. यानंतर कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी संशोधनाची उद्दिष्टे, गृहीतके, सामाजिक उपयोगिता, आणि आज घडीला इतिहासावर संशोधन होणे खूप गरजेचे आहे अशी मांडणी केली, या कार्यशाळेचे आभार राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. माधव वाघमारे यांनी मानले.कार्यक्रमाला इतिहास आणि राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी संशोधक विद्यार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.