हनुमान जयंती साजरी करून काल्याच्या कीर्तनाचा महाप्रसाद वाटून सांगता
अमळनेर:- तालुक्यातील पाडळसरे येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही ग्रामस्थ व संत तुकाराम महाराज भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू नववर्षाच्या प्रारंभ निमित्त श्रीराम जन्मोत्सव व ग्रामदैवत अंबिका देवीचा जागर म्हणून दिनांक २९ पासून चैत्रोत्सव साजरा केला जातो, व शेवटी हनुमान जयंतीला दिनांक ६ रोजी काल्याचे कीर्तनाने महाप्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता होते.
नववर्षाच्या स्वागतार्थ चैत्रोत्सवात ग्रामदैवत अंबिका देवीचा जागर, श्रीराम जन्मोत्सव व हनुमान जयंतीच्या मिलाप म्हणून श्रीक्षेत्र पाडळसरे येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद भागवत महापुराण कथेला अंबिका देवीच्या मंदिरात विधिवत गुढी उभारून विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मुर्त्या, श्रीमद भागवत गीता व देवी भागवत ग्रंथ स्थापित करून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहास दिनांक २९ रोजी देवीची अष्टमीला सुरुवात होईल, त्यात दैनंदिन कार्यक्रम खालील प्रमाणे राहतील दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती, देवीची आरती तर दुपारी १ ते ३ देवीचा नामजप सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ८:३० ते १०;३० पर्यंत जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम व देवीचा जागर होईल. हरिनाम कीर्तन सप्ताहात आळंदी येथील नामवंत कीर्तनकार यांची उपस्थिती लाभणार आहे. यात दिनांक २९ रोजी हभप भोला महाराज (पाडळसरेकर ) यांचे कीर्तन होईल. दिनांक ३० रोजी हभप श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रमात तुकाराम महाराज खोक्राळेकर कीर्तन करतील. दिनांक ३१ रोजी हभप प्रमोद महाराज धुळेकर, दिनांक १ रोजी हभप शामसुंदर महाराज घोडगावकर, दिनांक २ रोजी हभप जयेश महाराज निमकर, दिनांक ३ रोजी हभप धनराज महाराज मेहुटेहुकर , दिनांक ४ रोजी हभप श्रीराम महाराज भोणेकर यांचे कीर्तन होईल तर दिनांक ५ रोजी दुपारी ४ ते ६ पालखी सोहळ्याची मिरवणूक होऊन रात्री भावेश महाराज विटनेरकर यांचे जागरचे कीर्तन होईल व दिनांक ६ रोजी हनुमान जयंती साजरी करून सकाळी ८ ते १० यावेळेस हभप भावेश महाराज यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे मानकरी हभप रघुनाथ देवचंद पाटील यांच्याकडून महाप्रसाद वाटप करून कीर्तन सप्ताहाची सांगता होईल. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थ व संत तुकाराम महाराज भजनी मंडळ व हभप ताराचंद पाटील यांनी केले आहे.