
अमळनेर:- शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिनांक 18 एप्रिल रोजी जाहीर व्याख्यान संपन्न झाले.

यशदा पुणे येथील बबन जोगदंड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रभावी व्याख्यान दिले. प्रास्ताविक प्रा विजय खैरनार यांनी केले. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त योगेश पाटील यांची अतिथी म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांनी भूषविले. या प्रसंगी सुभाष चौधरी व हेमंत भांडारकर, सुरेश पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. सूत्रसंचालन डॉ राहुल निकम, डॉ विजय तुंटे यांनी केले. यशस्वीतेसाठी डॉ हर्षवर्धन जाधव, प्रा विजयकुमार वाघमारे, डॉ जगदीश सोनवणे, सोमचंद संदनशिव, प्रा कृष्णा संदनशिव, प्रा माधव भुसनेर, प्रा मिनाक्षी इंगोले, डॉ माधव वाघमारे,विनोद बिऱ्हाडे, नितीन संदनशिव, अमोल संदनशिव, अशोक बिऱ्हाडे, डॉ दिलीप कदम, गोकुळ बिऱ्हाडे आणि जयंती उत्सव समितीच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.







