अमळनेर:- तालुक्यातील डांगरी येथील २४ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टरला वट लावायला गेला असताना डोके चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ५ मे रोजी रात्री १० वाजता अविनाश प्रकाश शिसोदे हा बाजरीचे ट्रॅक्टर भरून नेत असताना उतरतीवर त्याने वट लावण्यास किरण सुनील पवार यास बोलविले. किरण हा मागील चाकास वट लावणार तोच अविनाश याने ट्रॅक्टर चालविल्याने किरण हा मागील चाकाखाली आल्याने त्याची कवटी फुटून रक्त निघाले. व तो काहीच हालचाल करीत नसल्याने त्यास पाहिले असता त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी अविनाश प्रकाश शिसोदे हा ट्रॅक्टर सोडून पळून गेला. सुनील गुणवंतराव पवार यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे. कॉ. मुकेश साळुंखे हे करीत आहेत.