![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2023/05/WhatsApp-Image-2023-05-26-at-8.44.10-AM.jpg?fit=1024%2C1024&ssl=1)
अमळनेर:- एच.एस.सी. प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023 चा ऑनलाईन निकाल दि. 25 रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाला. त्यात प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20230511-WA0034-3-723x1024.jpg?resize=640%2C906&ssl=1)
इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत प्रथम हेमंत नंदकुमार मराठे (८८.००%), द्वितीय धीरज मुलचंद तोलानी (८७.५०%), तृतीय तन्वी किरण कुवर (८७.१७%), चतुर्थ पार्थ महावीर पहाडे (८६.६७%) आणि पाचवा क्रमांक मयुरी रवींद्र चव्हाण (८४.८३%) हिने पटकावला आहे.
कॉमर्स शाखेत प्रथम कोमल प्रवीण पारख (९८.१७%), व्दितीय अभय जितेंद्र काळे (९६.५०%), तृतीय संयुक्तपणे कोमल राजेश पवार (९३.५०%) व प्रसन्ना दिनेश जैन (९३.५०%), चतुर्थ संयुक्तपणे डॉली जयेश कोठारी (९२.५०%) व मनस्वी किर्तीकुमार शाह (९२.५०%) व पाचवा क्रमांक केदार नितीन वाघ (९१.८३%) याने पटकावला आहे.
कला शाखेत प्रथम प्रेम परशुराम भोई (७८.५०%), व्दितीय लक्ष्मी योगराज पाटील (७६.६७%), तृतीय चेतन समाधान कंखरे (७६.१७%), चतुर्थ संयुक्तपणे जयेश वसंत पाटील (७५.३३%) व साक्षी देविदास पाटील (७५.३३%) तसेच पाचवा क्रमांक गौरी गोकुळ बोरसे (७४.६७%) यांनी पटकावला आहे.
किमान कौशल्य (इलेक्ट्रॉनि्क्स) शाखेत प्रथम कुणाल कुमार चव्हाण, व्दितीय दुर्गेश चुडामन पाटील, तृतीय राहुल कांतीलाल पाटील यांनी मिळवला आहे. तसेच किमान कौशल्य (इलेक्ट्रिकल्स) शाखेत प्रथम राहुल कैलास ढीवरे, व्दितीय तेजस रमेश पाटील, तृतीय मयूर माधवराव कुंभार यांनी पटकावले आहेत.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे खा. शि. मंडळाचे चेअरमन डॉ.अनिल नथ्थु शिंदे, व्हाईस चेअरमन प्रदिप कुंदनलाल अग्रवाल, संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र शांतीलाल झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र प्रभाकरराव देशमुख, माधुरी प्रमोद पाटील, विश्वस्त वसुंधरा दशरथ लांडगे, संचालक हरी भिका वाणी, डॉ. संदेश बिपीन गुजराथी, कल्याण साहेबराव पाटील, विनोद राजधर पाटील, निरज दिपचंद अग्रवाल, योगेश मधुसुदन मुंदडे, चिटणीस व प्राचार्य प्रा.डॉ.ए. बी. जैन, सहचिटणीस प्रा. डॉ. डी. आर. वैष्णव, मुख्याध्यापक प्रतिनिधी डी. एच. ठाकुर, महाविद्यालयीन प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. आर. एम. पारधी, शिक्षक प्रतिनिधी विनोद मधुकर पाटील, उपप्राचार्य प्रा.यु.जी.मोरे, पर्यवेक्षक प्रा. ए. के. अग्रवाल, प्रा. डी.व्ही. भलकार, प्रा. सुनिल पाटील, सचिन खंडारे, नितीन बाविस्कर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनींनी अभिनंदन केले असून सर्व शिक्षकेतर सेवकांनी परिश्रम घेतले आहेत.
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2023/05/image_editor_output_image590978864-1683686421551-1024x836.jpg?resize=640%2C523&ssl=1)