
२४ वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींविरुद्ध दिली फिर्याद…
अमळनेर:- तालुक्यातील सडावण येथील २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी मारवड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी पुनम ज्ञानेश्वर पाटील यांचे माहेर लोण खुर्द येथील असून वडील वारले असल्याने आईने बिकट आर्थिक परिस्थितीत ही खर्च करत लग्न लावून दिले. मात्र पती ज्ञानेश्वर भानुदास पाटील, सासरे भानुदास गोविंदा पाटील, सासू संगीता भानुदास पाटील, दिर उमेश भानुदास पाटील यांनी वारसासाठी मुलगा होत नाही तसेच गरीब घरची आहे म्हणून जुलै २०१७ ते सप्टेंबर २०२२ पावतो वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करत हाकलून देण्याची धमकी देत मानसिक व शारीरिक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यावरून मारवड पोलीसात ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोनि विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मपोहेकॉ रेखा इशी ह्या करीत आहेत.








