अमळनेर:- तालुक्यातील मंगरूळ येथील स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा १०० टक्के निकाल लागला असून मुलींनी बाजी मारली आहे.
योगिता देविदास पाटील व नेहा संजय पाटील या दोन्ही ९१.६० टक्के मिळवून संयुक्तरित्या शाळेत प्रथम आल्या आहेत. जयश्री अधिकार पाटील ९१.२० टक्के मिळवून द्वितीय तर मयुरी विठ्ठल पाटील ९१ टक्के मिळवून तृतीय आली आहे. संस्थेच्या चेअरमन सुहासिनी अनिल पाटील, सचिव श्रीकांत पाटील, मुख्याध्यापक प्रकाश पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.