अमळनेर:- धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील झुरखेडा हायस्कूलचा इयत्ता १० विचा निकाल १०० टक्के लागला असून निरुळ ता रावेर येथील प्रगतिशील शेतकरी नामदेव विठ्ठल पाटील यांची सुकन्या धनश्री नामदेव पाटील हीने झुरखेडा ता धरणगाव येथील आजोळी पानाचंद नारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनात झुरखेडा हायस्कूल झुरखेडा येथे इयत्ता १० वीत घवघवीत यश संपादन केले असून दिनांक २ रोजी जाहीर झालेल्या ऑनलाइन निकालात ८३.४०% टक्के गुण मिळवून विद्यालयातुन मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.
या यशाबद्दल कु धनश्री पाटील हिचे झुरखेडा हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही टी बडगुजर सर, आर आर पाटील सर, के एस पाटील सर, जी पी पवार सर, वाय पी पाटील सर व चावलखेडा येथील निळकंटेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक गोपाल बी पाटील सर, पुनमचंद चौधरी सर आदींसह आजोबा पानाचंद चौधरी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार वसंतराव पाटील, निलकंठेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सचिव व संस्था चालक यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग, झुरखेडा निरुळ परिसरातून अभिनंदन होत आहे.