
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील सु.हि.मुंदडे हायस्कुलचा इयत्ता १०वीचा निकाल १०० टक्के लागला असून कु. नंदीनी लोहार हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ग्रामविकास शिक्षण मंडळ, मारवड संचलित सु.हि.मुंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ.फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय, येथील इ.१० वी मार्च २०२३ चा निकाल १०० टक्के लागला असुन इ. १० वीच्या परीक्षेत कु. नंदीनी महेंद्र लोहार (मारवड) हिने ९४% गुण मिळवुन प्रथम क्रमांक, घनशाम चंद्रकांत चौधरी (मारवड) याने ९३% गुण मिळवुन द्वितीय क्रमांक तर कु. कामिनी दगडू पाटील (बोहरा) हिने 92.80 % गुण मिळवुन तृतिय क्रमांक पटकावला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड येथील अध्यक्ष जयवंतराव पाटील व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







