
२७ जून रोजी पंढरपूरी पोहचून माऊलींच्या दिंडीचे करणार स्वागत…
अमळनेर:- श्री संत सद्गुरू सखाराम महाराज वाडी संस्थांनची अमळनेर ते पंढरपूर पायी वारी दिंडीचे ५ जून रोजी हभप प्रसाद महाराजांच्या नेतृत्वाखाली प्रस्थान झाले. २८ जून रोजी दिंडी पंढरपूर ला पोहचणार असून माऊलीच्या दिंडीचे स्वागत करण्याचा मान अमळनेरच्या दिंडीला असल्याने हभप प्रसाद महाराजांच्या हस्ते स्वागत करण्यात येईल.

सकाळी प्रसाद महाराजांनी वाडी मंदिरात सकाळी पाच वाजता पूजा करून प पू गुरुवर्य वारीचे पारंपरिक भजन म्हणत बोरी नदीच्या वाळवंटात येऊन संत सखाराम महाराजांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यांनंतर प्रसाद महाराज सकाळी सात वाजता तुळशी बागेत गेले. त्याठिकाणी विधिवत पूजा करून सोबत देव घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले. त्या दरम्यान महिलांनी तुळशी डोक्यावर घेऊन भक्ती नृत्य केले. असंख्य भाविकांनी महाराजांचे दर्शन घेतले त्यांना पारंपरिक खडी साखरेचा प्रसाद दिला. दिंडी अमळनेरहून सडावण, पारोळा, भडगाव , नगरदेवळा ,नेरी , नागद ,बेलखेडा, नागापूर, करंजखेड, पिशोर, चिकलठाणा, टाकळी, दौलताबाद,म्हारोळा , बिडकीन,पैठण, शेवगाव, पाथर्डी ,धामणगाव ,आष्टी , अरणगाव ,नानज, जवळा, करमाळा, निंभोरे, वडशिवणे , करकम्ब, गुरसाळे मार्गे २७ जून रोजी पंढरपूर पोहचेल. २८ जून रोजी माऊलीच्या दिंडीचे स्वागत होईल.








