
समग्र शिक्षा अभियांनातर्गत पहिली ते आठवीची २६ हजार पुस्तके प्राप्त…
अमळनेर:- समग्र शिक्षा अभियांनातर्गत तालुक्यात पहिली ते आठवी पर्यंतचे २६ हजार ७१३ पुस्तके प्राप्त झाली आहेत. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या पूर्वतयारीला सुरुवात झाली असून पंचायत समितीतर्फे मोफत पुस्तके वाटप सुरू करण्यात आली आहे.

शासनातर्फे सरकारी, जि.प., नपा, अनुदानित खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळतात. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शाळेत पुस्तके मिळावीत म्हणून शासनाकडून पंचायत समितीला पहिलीची ३ हजार ३८६, दुसरीची ३ हजार ३८६ ,तिसरीची ३ हजार ३८६, चौथीची ३ हजार २१८, पाचवीची ३ हजार ४३५, सहावीची ३ हजार ८०१, सातवीची ४ हजार ९६, आठवीची ४ हजार१८९ अशी एकूण २६,७१३ पुस्तके प्राप्त झाली आहेत. त्यात मराठी माध्यमाची २० हजार ७१३ पुस्तके व इंग्रजी माध्यमाची ६ हजार पुस्तके आहेत. इंग्रजी माध्यमाची २ हजार १८४ पुस्तके बाकी आहेत. तर उर्दू माध्यमाची २ हजार १०९ पुस्तके बाकी आहेत. ५ जून पासून शाळांना पुस्तक वाटप सुरू करण्यात आले. येत्या पाच दिवसात सर्व शाळांना पुस्तक पोहच होणार आहेत. गटविकास अधिकारी विशाल शिंदे, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, विस्तार अधिकारी पी डी धनगर, केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंखे , प्रवीण वाडीले, ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते पुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी प्रफुल भदाणे, किरण शिसोदे हजर होते. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शाळेत पुस्तके वाटप करण्यात येणार असल्याने पहिल्याच दिवसापासून मुले आनंदात शाळेत येतील आणि हजेरीचे प्रमाण उत्तम असेल. शैक्षणीक वर्ष देखील खंड न पडता सुरू होणार असल्याने अध्यापन आणि अध्ययन चांगल्याप्रकारे होणार आहे.








