
अमळनेर:- तालुक्यातील लोणतांडा येथील माहेर असलेल्या २२ वर्षीय विवाहितेचा प्रसूतीवेळी अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोणतांडा येथील गायत्री हीचा विवाह एरंडोल तालुक्यातील खडके येथील दिनेश पवार यांच्याशी गेल्या वर्षीच झाला होता. प्रसूती जवळ आल्याने गायत्री ही माहेरी लोण तांडा येथे आली होती. दिनांक २५ रोजी अचानक प्रसूती कळा जाणवू लागल्याने तिला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिने मुलास जन्म दिला. मात्र अतिरक्तस्त्राव होत असल्याने तिला धुळे येथे येथील हिरे मेडिकल रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून सांगितले. याप्रकरणी पती दिनेश पवार यांच्या फिर्यादीवरून धुळे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येवून मारवड पोलीसात वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास म.हे.कॉ. रेखा भरत इशी ह्या करीत आहेत.







