अमळनेर:- तालुक्यातील शहापूर येथील एकात्मता माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षेत तांदळीचा उत्कर्ष पाटील हा प्रथम आला असून त्याने कळमसरे केंद्रातून व्दितीय क्रमांक पटकावला आहे.
तांदळी येथील प्रगतीशील शेतकरी व पंचक्रोशीत ख्यातनाम असलेले सलग 30 वर्षे रामकथा लावून नि:स्वार्थीपणे अन्नदान करणारे ह.भ.प. कै. बाजीराव आप्पा उर्फ हुला हरी पाटील यांचे पणतू व ज्ञानेश्वर बाबुलाल पाटील यांचे सुपुत्र उत्कर्ष ज्ञानेश्वर पाटील हा 89.60% गुण मिळवून कळमसरे केंद्रात दुसरा आला आहे. त्याला एकात्मता माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकगण आर.डी. पाटील, आर.एस. पाटील, शिंपी सर, ए.के. धनगर तसेच रतिलाल अण्णा, एकनाथ अण्णा व सर्व शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले. तांदळी येथील सर्व ग्रामस्थ मंडळ, समाज बांधव, मित्र परिवार यांनी उत्कर्षचे अभिनंदन व कौतुक केले आहे.