
अमळनेर:- तालुक्यातील भिलाली येथील २८ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना घडली असून मारवड पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ६ जून रोजी सकाळी महिलेचा पती शेतात कामासाठी निघून गेला. दुपारी १२:३० वाजता तो घरी आला असता पत्नी दिसून न आल्याने त्याने घरी विचारले असता त्यांनाही माहित नसल्याने त्यांनी आजूबाजूला तपास केला असता शेजारी महिलेने सांगितले की, सदर महिला पांझरा नदीकाठी दिसली होती व बेटावद येथे गादी भरायला जात असल्याचे सांगितले. त्यावरून बेटावद येथे व आजूबाजूच्या परिसरात तपास केला असता कोणतीच माहिती न मिळाल्याने महिलेच्या माहेरी तपास केला. मात्र तरीही शोध न लागल्याने मारवड पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.कॉ सचिन निकम करीत आहेत.




