
अनुचित प्रकार टाळण्यासाठी विविध आस्थापनांचा निर्णय…
अमळनेर:- काल दिनांक १४ जून रोजी विविध अफवा पसरल्याने नागरिकांची पळापळ होवून दुकाने पटापट बंद झाली होती त्यामुळे आज दिनांक १५ जून रोजी स्वयंस्फूर्तीने अमळनेर शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीतील संशयित आरोपीचा उपचारादरम्यान जळगाव येथे मृत्यु झाल्याने विविध अफवांना पुर येवून नागरिकांमध्ये घबराट पसरली तसेच बाजारपेठेत दगडफेक झाल्याची अफवा पसरल्याने दुकानदारांनी आपली दुकाने पटापट बंद केली. त्यामुळे नागरिकांनी पळापळ सुरू केली. तालुक्यात विविध अफवांना यामुळे उत आला होता. त्यामुळे शहरात शांतता प्रस्थापित व्हावी, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये म्हणून अनेक आस्थापना, व्यावसायिक, व्यापारी यांनी दिनांक १५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत स्वयंस्फुर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक खाजगी शाळांनी ही आज सुट्टी जाहीर केली असून कृपया नागरिकांनी सहकार्य करावे व विनाकारण गावात फिरू नये, अफवा पसरवू नये, शांतता कायम ठेवावी आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाने केले आहे.







