२० व २१ जून रोजी ग्रा.पं. कार्यालयात बोलविल्या विशेष ग्रामसभा…
अमळनेर:- मुदत संपूनही निवडणुका जाहीर झाल्या नाहीत आणि २२ मध्ये प्रभाग रचनांचे आरक्षण चुकले म्हणून शासनाच्या आदेशानुसार तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या नव्याने आरक्षण सोडती काढण्यात येणार आहेत.
२० जून रोजी शिरसाळे बुद्रुक, सडावण बुद्रुक, रढावण ग्रुप, नंदगाव ग्रुप, मठगव्हाण ग्रुप, दोधवद ग्रुप, ढेकूसीम ग्रुप, भरवस ग्रुप या ग्रामपंचायतींच्या प्रभागांचे आरक्षण काढण्यात येणार आहे. तर २१ जून रोजी पिंपळे खुर्द, लोंढवे, गोवर्धन ग्रुप, अमळगाव, मंगरूळ, मुडी प्रगणे डांगरी या ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीसाठी व्ही पी पाटील, सुरेश कटाळे, पी एस पाटील, आर डी सोनवणे, दिनेश कोते, एम आर सोनार, अमोल भदाणे, एस व्ही गिरासे,एन आय कट्यारे, एल डी चिंचोरे,पी एस धमके या अधिकाऱ्यांची तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी नियुक्ती केली असून २० व २१ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा बोलावण्यात आल्या आहेत.